भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी (दि.24) टी-20 विश्वकरंडकासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. इंग्लंड व वेल्स या देशांमध्ये 12 जून ते 5 जुलै यादरम्यान टी-20 विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे. भारताचा महिला संघ त्या आधी यजमान इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या लढती अनुक्रमे 28 मे, 30 मे व 2 जून रोजी होणार आहेत. भारतीय संघाचा ‌‘अ’ गटात समावेश असून, या गटामध्ये भारताला ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड्स, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका या देशांचा सामना करायचा आहे. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना दि.14 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या महिला संघात हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटीया, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणूका सिंग, क्रांती गौड, श्रेयांका पाटील व राधा यादव यांचा समावेश आहे.

Exit mobile version