साहेबांच्या खेळात भारतीयांची मक्तेदारी

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये भारतीय वंशाचे अनेक क्रिकेटपटू दुसर्‍या देशांकडून खेळत आहेत. अमेरिकेच्या क्रिकेट संघात एक-दोन नव्हे तर तब्बल 6 भारतीय वंशाचे क्रिकेटपटू आहेत. संघाचा कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज मोनांक पटेल हा भारतीय वंशाचा आहे. मोनांक व्यतिरिक्त या संघात हरमीत सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार आणि सौरव नेत्रावलकर हे भारतीय वंशाचे क्रिकेटपटू आहेत. न्यूझीलंड क्रिकेट संघात भारतीय वंशाचा एकच क्रिकेटपटू आहे. हा खेळाडू आहे स्टार ऑलराऊंडर रचिन रवींद्र. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात एक भारतीय वंशाचा क्रिकेटपटू आहे, तो म्हणजे केशव महाराज. युगांडा क्रिकेट संघात भारतीय वंशाचे दोन खेळाडू आहेत. अल्पेश रामजानी आणि रौनक पटेल हे ते दोन खेळाडू आहेत. दोघेही संघाचे महत्त्वाचे भाग आहेत. कॅनडाच्या संघात 4 भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. या 4 खेळाडूंमध्ये रवींद्रपाल सिंग, निखिल दत्ता, परगट सिंग आणि श्रेयस मोव्वा यांचा समावेश आहे. ओमानच्या संघातही एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. कश्यप प्रजापती असे या खेळाडूचे नाव आहे.

Exit mobile version