शेवटच्या ‘नो बॉल’मुळे भारताची हार

अंपायरच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांतील झालेला दुसरा सामना जरी ऑस्ट्रेलियाने जिंकला असला, तरी या सामन्याच्या निकालावरुन आता वाद निर्माण झाला आहे. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला तीन धावांची गरज असताना त्या चेंडूला अंपायरने ‘नो बॉल’ दिला आणि ऑस्ट्रेलियाला फ्री हिट दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हारलेला सामना पुन्हा सहज जिंकला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सुरु असलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयाची संधी होती. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला तीन धावांची गरज असताना भारताची झुलन गोस्वामी बॉलिंग करत होती. झुलनने टाकलेला शेवटचा चेंडू हा ऑस्ट्रेलियाची बॅट्समन बेथ मूनीच्या बॅटला लागून मिडविकेटवर उभ्या असलेल्या फील्डरच्या हातात आला.

अंपायरच्या निर्णयाने सामना पलटला
भारतीय संघाने विजयाचा जल्लोश सुरु केल्यानंतर फील्ड अंपायरने थर्ड अंपायरला या चेंडूबद्दल विचारलं आणि झुलनने टाकलेला तो शेवटचा चेंडू नो बॉल दिला. सोबतच सामना हारलेल्या ऑस्ट्रेलियाला फ्री हिट मिळाली. या संधीचा फायदा घेऊन ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. पण अंपायरच्या या निर्णयावर अनेक स्तरातून टीका केली गेली.

Exit mobile version