फिफा क्रमवारीत भारताची घसरण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ चार स्थानांनी घसरून 121 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, जी गेल्या काही वर्षांतील त्याची सर्वात वाईट कामगिरी आहे. गेल्या महिन्यात गुवाहाटी येथे झालेल्या फिफा विश्‍वचषक 2026 पात्रता फेरीच्या दुसर्‍या फेरीत भारताचा अफगाणिस्तानकडून 2-0 असा पराभव झाला होता.

गेल्या वर्षी भारताने आंतरखंडीय चषक, त्रिकोणी स्पर्धा आणि चॅम्पियनशिप जिंकून अव्वल 100 मध्ये पोहोचले होते, परंतु 26 मार्च रोजी खालच्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तान संघाविरुद्धचा पराभव अनपेक्षित होता. जानेवारीमध्ये झालेल्या आशियाई कपमध्ये भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही आणि चार संघांच्या ‘ब’ गटात चौथ्या स्थानावर राहिला. गतविजेता अर्जेंटिना अव्वल तर फ्रान्स दुसर्‍या, इंग्लंड तिसर्‍या आणि बेल्जियम चौथ्या क्रमांकावर आहे. ता, ब्राझील पाचव्या स्थानावर आहे.

Exit mobile version