भारताचा सुवर्णभेद

आदिती स्वामीची ऐतिहासिक कामगिरी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या आदिती गोपिचंद स्वामी हिनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत वैयक्तीक खेळ प्रकारात तीनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. हे सुवर्ण पदक भारतासाठी महत्वाचं आहे कारण भारतानं अशा प्रकारे वैयक्तिक तिरंदाजीत पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवलं आहे. यामुळं आदिती ही आधुनिक तिरंदाजीत सर्वात तरुण महिला चॅम्पियन बनली आहे.

मी खूपच खूश आहे कारण यापूर्वी भारताला या स्पर्धेत वैयक्तीक प्रकारात एकही गोल्ड मेडल मिळालं नव्हतं. पण मला वैयक्तिक आणि टीमसाठी गोल्ड मेडल आणण्याची संधी मिळाली. मला हे अपेक्षित नव्हतं की, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला इतका चांगला परफॉर्मन्स करायला मिळेल. पण आता यापुढेची माझा असाच चांगला परफॉर्मन्स राहिलं.

आदिती स्वामी

सांघिक प्रकारात आम्हाला पहिल्याच दिवशी सुवर्णपदक मिळालं होतं. त्यामुळं मी काहीशी निश्चिंत होते कारण माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. याचा मला चांगला फायदा झाला, ही गोष्ट सकारात्मक पद्धतीनं घेत वैयक्तिक खेळात मी चांगली कामगिरी केली, अशा शब्दांत आदितीनं खेळादरम्यानची परिस्थिती कथन केली. पदक मिळाल्यानंतर अद्याप मी कुठलंही सेलिब्रेशन केलेलं नाही. पण पहिल्यांदा मी घरी फोन केला. घरी सर्वजण माझा खेळ पाहत होते. त्यानंतर मी माझ्या कोचेसशी बोलले तसेच माझ्या सहकारी खेळाडूंशी बोलले, अशा शब्दांत आदिती स्वामीनं माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version