| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये मीनाक्षी हुडाने फोझिलोवाचा 5-0 च्या फरकाने मोठा पराभव केला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीनाक्षी म्हणाली की, मी सुरुवातीला घाबरले होते, पण नंतर मी गर्दी पाहून उत्साह निर्माण झाला. देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मला आनंद झाला आहे.
विश्वचषकातील कांस्यपदक विजेत्या इटलीच्या सिरीन चाराबीला पराभूत हरवून सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या 54 किलो वजनी गटात प्रीतीने सिरीनवर जोरदार मुक्का मारले आणि पूर्ण नियंत्रणासह सुवर्णपदकावर नाव कोरले. यानंतर, भारताच्या अरुंधती चौधरीने देखील आपला दम दाखवत उझबेकिस्तानच्या अझीजा झोकिरवाला धूळ चारत सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर नुपूर शेओरनने महिलांच्या 80+ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय सोटिम्बोएवाला पराभूत करत भारताच्या खात्यात चौथे सुवर्णपदक टाकले. भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकत भारताच्या खात्यात पाचवे सुवर्णपदक जमा केले. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात निखतचा सामना चिनी तैपेई बॉक्सर जुआन यी गुओशी झाला. 51 किलो वजनी गटात निखतने उत्कृष्ट पंच आणि वेगाने तिच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आणि राष्ट्रीय ध्वज अभिमानाने फडकवला.







