टेबल टेनिसमध्ये भारताचे पदक पक्कं

विश्वविजेत्या चिनी खेळाडूंवर मात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या भारताच्या महिला टेबल टेनिस खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वात मोठ्या धक्कादायक निकालाची नोंद तर केलीच, पण त्याबरोबर पदकही निश्चित केले. त्यांनी चीनच्या विश्वविजेत्या टेन मेंग आणि यिदी सँग या जोडीचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत त्यांनी 11-5, 115.5-11, 11-9 असा विजय मिळवला. चीनची ही विश्वविजेती जोडी जागतिक मानांकनात दुसऱ्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताला महिला दुहेरीत आतापर्यंत एकही पदक मिळालेले नाही. त्यामुळे सुतीर्थ आणि अहिका यांचा पदक निश्चित करणारा हा विजय अभिमानास्पद आहे.एकीकडे मनिका बत्रासारखी अनुभवी खेळाडू महिला एकेरीत पराभूत होत असताना सुतीर्थ आणि अहिका यांचा विश्वविजेत्या जोडांविरुद्ध कसा निभाव लागणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती; परंतु या भारतीय महिलांनी अनुभवी चीनच्या खेळाडूंना लयच मिळवू दिली नाही. पहिला गेम 8 मिनिटांत जिंकला. तेथेच भारतीयांनी सनसनाटी निर्माण केली
.
हाच चमकदार खेळ सुतीर्थ आणि अहिका यांनी कायम ठेवत दुसरा गेम 9 मिनिटांत जिंकला. चीनच्या खेळाडू फीरहँडवर चुका करत होत्या. त्याचा फायदा भारतीयांना झाला. मात्र त्यांनी जोरदार खेळ करत तिसरा गेम जिंकला परंतु लय सापडलेल्या भारतीयांनी चौथा गेम जिंकून चीनच्या खेळाडूंचा खेळ खल्लास केला.

Exit mobile version