भारताचा न्यूझीलंड दौरा 2022 पर्यंत रद्द

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाचा प्रस्तावित न्यूझीलंड दौरा पुढील वर्षांपर्यंत रद्द करण्यात आला आहे. आयसीसीच्या फ्यूचर टूअर प्रोगामनुसार विराट कोहली अँड कंपनी वर्ल्ड कप सुपर लीग क्वालीफाय करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध तीन वनड सामने खेळायचे आहेत. पण, कोरोना व्हायरसमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही मालिका रद्द केली. किवी बोर्डांनी अनेक मालिका रद्द केल्या आहेत आणि त्यामुळ अनेक संघ न्यूझीलंड दौरा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. फ्यूचर टूअर प्रोग्रामनुसार भारताचा न्यूझीलंड दौरा होणार नाही आणि तो पुढील वर्षी नोव्हेंबरनंतरच होईल. या कालावधीत न्यूझीलंडचा संघही नोव्हेंबरपर्यंत विविध देशांच्या दौर्‍यावर असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तानात मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी दाखल झाला आहे. त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी यूएईत दाखल होईल आणि नंतर भारत दौर्‍यावर येईल. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर किवी संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे आणि तेथेच तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी व तीन ट्वेंटी-20, नेदरलँड्सविरुद्ध तीन वन डे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळेल. बांगलादेश व दक्षिण आफ्रिका विरुद्धची कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे.

Exit mobile version