अवघ्या तेराव्या षटकात गाठले लक्ष्य
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय 19 वर्षांखालील महिला संघाने आशिया कप 2024 स्पर्धेत बांगलादेशविरूद्धचा दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने हा सामना अवघ्या 12.1 षटकातच जिंकला आहे. भारताने प्रथम गोलंदाजी करत बांगलादेश संघाचा डाव 8 बाद 80 धावांवर रोखला. प्रत्युत्तरात भारताची सलामीवीर जी त्रिशाने 58 धावांची नाबाद खेळी केली आणि भारताने सामन्यात 8 गडी राखत बाजी मारली आहे. याआधी भारताने स्पर्धेत पाकिस्तान व नेपाळ संघाला पराभूत केले आहे.
प्रथम फंलदाजीसाठी आलेल्या बांगलादेशचा पहिला बळी मिळवण्यासाठी भारताला 5.2 षटकांपर्यंत वाट पाहावी लागली होती. 27 व्या षटकात भारताला पहिला बळी मिळाला. ज्यामध्ये मस्त इव्हा 14 धावा करून माघारी परतली. त्यानंतर बांगलादेशचे गडी बाद व्हायला सुरूवात झाली. यावेळी, बांगलादेशच्या अवघ्या 4 खेळाडूंना दुहेरी धावा करता आल्या. त्यांना 20 षटकांअंती 80 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय गोलंदाज आयुषी शुक्ला हीला सामन्यात 3 बळी घेण्यात यश आले. सोनम यादवला 2, तर मिथीला व्ही शबनम शकील यांना प्रत्येकी 1 बळी घेता आला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 10 धावांवर पहिला गडी गमवावा लागला. सलामीवीर जी कामिलिनीला शून्यावर माघारी परतावे लागले. तिच्या जागी फलंदाजीसाठी आलेली सानिका चाळकेही 1 धावेवर बाद झाली. दोघींनाही मस्त अनिशा अक्तर सोबा हीने बाद केले. मात्र, त्यानंतर सालामीवर जी त्रिशा व कर्णधार निकी प्रसाद हिने दमदार फटकेबाजी केली. जी त्रिशाने 45 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये तिने 10 चौकार ठोकले. तर, निकी प्रदासने 1 चौकार व 2 षटकारांसह 15 चेंडूत 22 धावांची खेळी केली. दोघींनी 46 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली आणि अवघ्या 12.1 षटकात भारताला विजय मिळवून दिला.
