22 चेंडूंत ठोकले अर्धशतक
| इंग्लंड | वृत्तसंस्था |
भारताची युवा महिला क्रिकेटपटूआणि लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्मा सध्या द हंड्रेड लीग मध्ये खेळत आहे. सोमवारी तिने जबरदस्त कामगिरी करत तिच्या बर्मिंगहॅम फिनिक्स संघाला विजय मिळवून दिला. एजबॅस्टन येथे वेल्श फायर आणि बर्मिंगहॅम फिनिक्स या महिला संघांमध्ये एक सामना खेळला गेला. यामध्ये शफालीच्या संघाने 10 गडी राखून नेत्रदीपक विजयाची नोंद केली.
वेल्श फायर संघाने सलामीवीर ब्रायनी स्मिथच्या (38) मदतीने 100 चेंडूंत 9 गडी गमावून 127 धावा केल्या. बर्मिंगहॅम संघाला 128 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 76 चेंडूत गाठले. शफाली वर्माने 22 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नाबाद 76 धावांची खेळी केली. तिने या डावात 42 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकार, 2 षटकार ठोकले. शफालीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.