वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजसाठी भारताची जोरदार तयारी

शाहरुख खानसह साई किशोर स्टँडबायवर
। मुंबई । वृत्तसंस्था ।

भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी आधीच संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने या संघामध्ये आणखी दोन खेळाडुंची नावे जोडली आहेत. सध्यातरी हे दोन्ही खेळाडू मुख्य संघाचा भाग नसतील. पण गरज पडल्यास त्या दोघांचा टीम इंडियामध्ये समावेश केला जाईल. बीसीसीआयने सध्या या दोन्ही खेळाडूंना स्टँडबायवर ठेवले आहे. शाहरुख खान आणि साई किशोर अशी बीसीसीआयने स्टँडबायवर ठेवलेल्या दोन खेळाडुंची नावे आहेत. आगमी वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी दोन खेळाडूंना स्टँडबायवर ठेवण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सीरीजवर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
शाहरुख खान तामिळनाडूचा मधल्याफळीतील फलंदाज आहे. सामना संपवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये शाहरुख खानने फिनिशरचा खेळ दाखवला आहे. त्याशिवाय फिरकी गोलंदाज साई किशोरलाही तयार ठेवण्यात आले आहे. या दोघांशिवाय तामिळनाडूच्याच वॉशिंग्टन सुंदरचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आधीच संघात समावेश करण्यात आला आहे.

टी.नटराजनला मिळू शकते संधी
डावखुरा वेगवान गोलंदाज टी.नटराजनचा तामिळनाडूच्या रणजी संघात समावेश होऊ शकतो. पण त्याआधी त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. नटराजनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मागच्या दोन महिन्यांपासून तो संघाबाहेर आहे. त्याला टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. रणजी करंडक स्पर्धा 13 फेब्रुवारीपासून सुरु होईल. यामध्ये विजय शंकर तामिळनाडूचे नेतृत्व करेल.

Exit mobile version