• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

न्यूयॉर्कमध्ये भारताचे सर्जिकल स्ट्राईक

Krushival by Krushival
June 10, 2024
in क्रीडा, विदेश
0 0
0
न्यूयॉर्कमध्ये भारताचे सर्जिकल स्ट्राईक
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विश्‍वचषकातील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात

। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवले आहे. 120 धावांचे सोपे लक्षही पाकिस्तानला झेपले नाही. एकीकडे पूर्ण सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला असताना भारतीय क्रीडाप्रेमींनी आशा सोडून दिली होती. 14 व्या षटकापर्यंत संपूर्ण सामन्यावर पाकिस्तानची पकड होती. पाकिस्तानने 14 षटकांत 3 गडी गमवून 80 धावा केल्या होत्या. 36 चेंडूत 40 धावांची गरज होती आणि सात गडी हातात होते. अशावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढले आणि 15वे षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने सेट फलंदाज रिझवानचा त्रिफळा उडवला. रिझवानच्या बळी नंतर भारतीय संघ सामन्यात परतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांना डोकं वर काढूच दिले नाही. गडी राखीव असूनही पाकिस्तानला 6 धावांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले.

दरम्यान, हलक्या पावसाच्या सरींमुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिली गोलंदाजी घेणार हे नक्की होते. संघात चार दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्याने बाबर आझमने नेमके तेच केले. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा, विराट कोहलीची जोडी सलामीसाठी मैदानात उतरली. शाहीन शाह आफ्रिदीच्या षटकात रोहितने मारलेला षटकार प्रेक्षकांत जाऊन पडला. परंतु, रोहित पुढच्या षटकात झेल देऊन परतला. जम बसवायला थोडा वेळ घेणार्‍या रिषभ पंतने हारीस रौफला एकाच षटकात तीन चौकार मारल्याने 10 षटकांअखेर भारताच्या खात्यात 81 धावा जमा झाल्या होत्या. भारतीय फलंदाज अडचणीतून मार्ग काढत 140 धावांचा टप्पा गाठणार वाटत असताना मधल्या फळीत पडझड झाली. 3 बाद 89 धावांवरून 7 बाद 96 धावसंख्या झाली. चार फलंदाज पाठोपाठ बाद झाले ज्यात 42 धावा करणारा रिषभ पंतही होता. भारताचे सगळे फलंदाज वेगवान गोलंदाजांना बाद झाले. ज्यात 8 फलंदाज झेलबाद झाले. आणि 19 षटकात भारताचा डाव 119 धावांवर आटोपला.

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील भारताची ही प्रथम फलंदाजीनंतर तिसरी निचांक धावसंख्या आहे. यापूर्वी 2016 मध्ये 79 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला होतो. टी-20 मध्ये सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाला सर्वच्या सर्व 11 सामन्यांत हार पत्करावी लागलेली आहे. पाकिस्तानने टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताला सर्वबाद केले आहे.

बुमराह ठरला पाकिस्तानचा कर्दनकाळ
न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ सामना जिंकला त्याचा नायक होता जसप्रीत बुमराह. या सामन्यात बूम बूमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरून 120 धावांचे माफक लक्ष्य असतानाही पाकिस्तानी फलंदाज गुडघे टेकताना दिसत होते. जसप्रीत बुमराहने 4 षटकातील 24 चेंडूत केवळ 14 धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. विशेष म्हणजे बूम बूमच्या 24 पैकी 15 चेंडू निर्धाव होत्या.
पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात
या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संकटात आले आहे. ङ्गअफ गटातील हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला आणि आता अमेरिका व भारत प्रत्येकी 4 गुणांसह आघाडीवर आहेत. पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकून त्यांचे 4 गुण होतील. परंतु, त्याचवेळी त्यांना अमेरिकेच्या उर्वरित दोन सामन्यांत पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. अशावेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssports newst20 news
Previous Post

अमृता भगतला सुवर्ण

Next Post

महाराष्ट्राच्या कन्येची देदीप्यमान कामगिरी

Krushival

Krushival

Related Posts

क्रीडा

आयपीएलमधील गोलंदाजांसाठी सुनील गावस्कर यांचा पुढाकार

May 11, 2026
बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले
क्रीडा

बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले

May 11, 2026
चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!
क्रीडा

चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!

May 11, 2026
हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!
क्रीडा

हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!

May 11, 2026
मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!

May 11, 2026
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!
क्रीडा

भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!

May 11, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या कन्येची देदीप्यमान कामगिरी

महाराष्ट्राच्या कन्येची देदीप्यमान कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?