भारताचा क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी संघ जाहीर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बेलग्राडे (सर्बिया) येथे 30 मार्च रोजी होणार्‍या प्रतिष्ठेच्या जागतिक क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने सहा सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला. या संघात आशियाई स्पर्धेतील पदक विजेते तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांचा समावेश आहे.

पुरुषांच्या संघात आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता कार्तिक कुमार आणि ब्राँझविजेत्या गुलवीर सिंग यांच्यासह राष्ट्रीय स्पर्धा गाजवणार्‍या हेमराज गुज्जर, गुलवीर सिंग यांचाही समावेश आहे. गुलवीर सिंगने नुकताच 10 हजार मीटरमध्ये 16 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. त्याने 27.41.81 हा जुना विक्रम 20 सेकंदाने मोडला. सुरेंद्रसिंग याने 2008 मध्ये हा विक्रम केला होता; परंतु त्याची ही कामगिरी पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यास पुरेशी ठरली नाही. 27.00.00 ही ऑलिंपिक पात्रता वेळ आहे. पुरुषांच्या या संघासह महिला राष्ट्रीय विजेती अंकिता, सीमा आणि अंजली कुमारी यांचा समावेश आहे.

Exit mobile version