बांगलादेश दौर्‍यासाठी भारताच्या संघाची घोषणा

। मुंबई । वृत्तसंस्था ।

डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौर्‍यावर जाणार आहे. या छोटेखानी दौर्‍यावर भारतीय संघ तीन एकदिवसीय व दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड काही दिवसांपूर्वी झाली होती. या संघात निवड झालेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारतीय संघात दोन नवीन नावांना संधी मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची अधिकृत घोषणा नुकतेच केली.

2022 या वर्षात सूर्यकुमार यादवपेक्षा इतर दुसर्‍या भारतीय खेळाडूने जास्त धावा केल्या नाहीत. तरी देखील त्याला बांगलादेश दौर्‍यातून वगळण्यात आले.

कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

Exit mobile version