टी 20 मध्ये भारताची विजयी सलामी

विंडीजवर सहा गडी राखून मात; बिश्‍नोईची चमक
। कोलकाता । वृत्तसंस्था ।
लेग-स्पिनर रवी बिश्‍नोईच्या (2/17) पदार्पणातील प्रभावी मार्‍यानंतर रोहित शर्मा (19 चेंडूंत 40 धावा) आणि सूर्यकुमार यादव (18 चेंडूंत नाबाद 34) या मुंबईकरांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने बुधवारी पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजला सहा गडी आणि सात चेंडू राखून नमवले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात पाहुण्या विंडीजने दिलेले 158 धावांचे लक्ष्य भारताने 18.5 षटकांत गाठले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने आक्रमक शैलीत फलंदाजी करत विंडीजच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. त्याने 19 चेंडूंतच चार चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने 40 धावा फटकावल्या. त्याचा सलामीचा साथीदार इशान किशनला (42 चेंडूंत 35) मात्र धावांचा वेग राखण्यात अपयश आले. या दोघांनी 64 धावांची सलामी दिल्यावर त्यांना फिरकीपटू रॉस्टन चेसने माघारी पाठवले. मग विराट कोहली (17) आणि ऋषभ पंत (8) यांना खेळपट्टीवर फार काळ टिकाव धरता आला नाही. पण हे दोघे बाद झाल्यावर सूर्यकुमार आणि डावखुरा वेंकटेश अय्यर (13 चेंडूंत नाबाद 24) यांनी पाचव्या गडयासाठी 48 धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 157 अशी धावसंख्या उभारली. त्यांचा सलामीवीर ब्रेंडन किंगला (4) भुवनेश्‍वर कुमारने पहिल्याच षटकात बाद केले. यानंतर कायले मेयर्स (24 चेंडूंत 31) आणि निकोलस पूरन (43 चेंडूंत 61) यांनी चांगली फलंदाजी करत विंडीजचा धावफलक हलता ठेवला. मेयर्सला चहलने बाद केले, तर चेस आणि रोव्हमन पॉवेल (2) यांना पदार्पणवीर बिश्‍नोईने एकाच षटकात माघारी धाडत विंडीजला अडचणीत टाकले. अखेर पूरनला कर्णधार किरॉन पोलार्डची (19 चेंडूंत नाबाद 24) साथ लाभल्याने विंडीजला 150 धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.
9 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 पदार्पणात सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा बिश्‍नोई हा भारताचा नववा खेळाडू ठरला. तसेच ही कामगिरी करणारा तो प्रज्ञान ओझा आणि अक्षर पटेल यांच्यानंतरचा तिसरा भारतीय फिरकीपटू आहे.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : 20 षटकांत 7 बाद 157 (निकोलस पूरन 61, कायले मेयर्स 31, किरॉन पोलार्ड नाबाद 24; रवी बिश्‍नोई 2/17, हर्षल पटेल 2/37) विजयी वि. भारत : षटकांत (रोहित शर्मा 40, इशान किशन 35, सूर्यकुमार यादव नाबाद 34; रॉस्टन चेस 2/14)

रोहित पंचांवरच भडकला
भारताने हा सामना जिंकला असला, तरी कॅप्टन रोहित शर्मा मैदानावरील पंचांच्या एका निर्णयावर नाराज झाला. रोहित शर्माची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऊठड घेण्याच्या निर्णयावरुनही कनफ्युजन असताना रोहितने पुन्हा एकदा विराट कोहलीचं लगेच ऐकल्याचं दिसून आले. सामन्याचं सातव षटक सुरु होतं. टी 20 मध्ये भारतासाठी डेब्यु करणारा रवी बिश्‍नोई गोलंदाजी करत होता. समोर रॉस्टन चेस होता. बिश्‍नोईने त्याच्या पहिल्या षटकात तीन वाईड बॉल टाकले. रोहितने रिव्ह्यू घेतला नसता, तर तो चौथा वाईड बॉल ठरला असता. बिश्‍नोईने पहिल्या षटकातील पाचवा चेंडू गुगली टाकला. रॉस्टनने लेग साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पॅडला लागून विकेटकिपर पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. आवाज झाल्यामुळे बिश्‍नोईने झेलबादचे अपील केले. पण पंचांनी वाईड बॉल दिला. त्यावर रोहितने वाईड बॉल कुठे देतो यारफ असं म्हटले. रोहित पंचांच्या या निर्णयावर वैतागल्याचं त्याच्या चेहर्‍यावरुन स्पष्ट दिसत होते. चेंडू रॉस्टन चेसच्या खूप जवळून गेल्यामुळे आवाज झाला होता. स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनमुळे रोहित जे बोलला ते सर्वांना ऐकू आले.

Exit mobile version