परमबीर सिंहावर कारवाईचे संकेत

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे जवळपास 280 दिवसांनंतर अखेर मुंबईत हजर झाले. खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी गुरुवारी परमबीर सिंह कांदिवलीतील क्राईम ब्रांच युनिटसमोर हजर झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर परमबीर सिंह हे गायब झाले होते. न्यायालयाकडून आणि ईडीकडून देखील चौकशीचे समन्स दिल्यानंतर ते हजर झाले नसल्यामुळे त्यावरून बरीच चर्चा सुरू होती. अखेर ते आता हजर झाले असून आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूतोवाच दिले आहेत. पोलीस सेवा नियमावलीनुसार परमबीर सिंह यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. यासंदर्भात पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतरच घेतला जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version