। अलिबाग । वार्ताहर ।
पाणी ही प्रत्येक जीवांची मुलभूत गरज असली तरी मानवाच्या गैरकृत्यांमुळे आज पाणीटंचाईचे मोठे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. या समस्येच्या निवारण्यासाठी संपूर्ण जग जलसंधारणासाठी प्रयत्नशील असून, या चळवळीत प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ओएसिस संस्थेचे कार्यकर्ते प्रतिक कोळी यांनी केले आहे.
भारत सरकार अंतर्गत युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र संघटन, रायगड-अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग आणि ओएसिस : बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा संचालित स्पर्धा विश्व अकॅडमीच्या अभ्यासिकेत जलमंत्रालयाच्या ’कॅच द रेन प्रकल्पांतर्गत जलसंधारण जागृती कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, तपस्वी गोंधळी, सुचिता साळवी, प्रगती कासार हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तपस्वी गोंधळी, सूत्रसंचालन मानसी नागावकर तर आभारप्रदर्शन सुचिता साळवी यांनी केले.






