| नेरळ | प्रतिनिधी |
रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे मंगळवारी नेरळ जवळील वंजारपाडा गावातील कालिका माता मंदिरात आले होते.आपल्या नातवाच्या जन्म दिवसानिमित्त कालिका मातेचे दर्शन आणि नवग्रह पूजा करण्यासाठी मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी पिरामल हे आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते. पिरामल ग्रुपचे अजय पिरामल आणि भरत मेहरा यांच्या माध्यमातून राधामीरा ट्रस्ट चालविली जाते. या ट्रस्टचे माध्यमातून तेथे मंदिर उभारले आहे.
मुकेश अंबानी यांच्यासोबत ईशा अंबानी पिरामल,राधा मीरा ट्रस्टचे अध्यक्ष भरत मेहरा,त्यांच्या पत्नी गेहना मेहरा ,ट्रस्टचे विश्वस्त सेवा कपूर,विश्वस्त हुमा अली,अंजली, वाराणसी येथील साडी किंग म्हणून ओळख असलेले ब्रिजेश गुप्ता, विश्वस्त नासिर शेख, शबनम शेख आदी उपस्थित होते. दुपारी साडे तीन वाजता मुकेश अंबानी यांच्या गाड्यांचा ताफा वंजारपाडा येथून नेरळ येथे आला आणि पुढे मुंबईकडे रवाना झाला.