गायी, म्हशींसाठी वंध्यत्व निवारण अभियान

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पशुधन यांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांमधील वंधत्व निवारण अभियान राबविले जात आहे. लम्पिसारख्या चर्मरोग आणि अन्य रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी वंधत्व निवारण अभियान पशुंसाठी सुरु आहे. तालुक्यातील सर्व गावात जाऊन पशुधन अधिकारी आणि पशुवैद्यकीय विभागाचे माध्यमातून हे अभियान यशस्वी केले जात आहे.

तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांमध्ये वंधत्व निवारण अभियान राबविले जात आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा रायगड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी, पंचायत समिति कर्जत, सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत तसेच पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात गावपातळीवर हे अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सदर शिबिरे ही गाव पातळीवर घेतली जात आहे. जनावरांच्या आरोग्य तपासणीबरोबरच पशुसंवर्धनविषयक इतर बाबी तसेच पशुवसंवर्धन विभागाच्या विविध योजनांबाबत ही पशुपालकांना मार्गदर्शनदेखील केले जात आहे. तरी, शेतकरी आणि पशुपालकांनी आपल्या पशूंची आरोग्य तपासणी करून घावी, असे आवाहन कर्जत पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी केले आहे.

Exit mobile version