अफगाण दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
तालिबानीयांनी अफगाण राष्ट्राचा ताबा घेतल्यापासून सद्यस्थितीत पहिल्यादांच अफगाण दहशतवादी भारतात घुसल्याच्या बातम्या येत आहेत. देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात धोक्याचा इशारा दिला असून एखाद्या विघातक हल्ल्याची शक्यताही व्यक्त केली आहे. सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, उरी सेक्टरमधील एका पोस्टवर सुरक्षा जाळी कापून अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. अफगाण दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यात मदत करुन परतत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांची चकमक झाली, ज्यात एक जवान जखमी झाला. दहशतवाद्यांकडून प्राणघातक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात असे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे की, 18 सप्टेंबर 2021 रोजी उरी सेक्टरमधील एका पोस्टमधून पाच अफगाण दहशतवादी भारतात घुसले आहेत. भारतीय लष्करातर्फे उरी सेक्टरमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. हे दहशतवादी अफगाणिस्तानातून आले असल्यामुळे ते काश्मीरी लोकांमध्ये सहज मिसळू शकत नाहीत. सुरक्षा दले सतत त्यांचा शोध घेत आहेत. सर्व संशयास्पद ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. याशिवाय जे त्यांना आश्रय देऊ शकतात त्यांचीही चौकशी केली जात आहे. लष्करी छावण्या किंवा मोठ्या सरकारी संस्थांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version