बाजारात पापलेटची आवक वाढली

| मुरूड | वार्ताहर |

बर्‍याच दिवसानंतर बुधवारी मासळी खवव्यांची वर्दळ पाहायला मिळली. बुधवारी (दि. 13) मुरूड मार्केटमध्ये ताजी पापलेट मासळी विक्रीस आली होती. जोडीला कोलंबी, छोट्या सुरमई, मांदेली अशी निवडक मासळी असली तरी पापलेटचा रुबाब वेगळाच दिसत होता.

पापलेट जोडीची किंमत 400/ ते 500 पर्यंत सांगण्यात येत होती. येथील पापलेट मासळी विक्रेती लक्ष्मी पाटील यांनी सांगितले की, खूप दिवसांनी मार्केटमध्ये मोठ्या आकारातील पापलेट उपलब्ध झाली आहे. कोलंबीदेखील आल्याने खवयांची खूप दिवसांनी चंगळ झाली आहे.

Exit mobile version