| चिरनेर | प्रतिनिधी |
न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्यावतीने जेएनपीए परिसरातील ट्रेलर, रिक्षा आदी वाहनचालकांना रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन प्रबोधन केले.
जेएनपीए परिसरातील क्रिश फूड इंडस्ट्री, पीयूबी जंक्शन, जेएनपीटी एसईझेड आदी ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध कंपन्यांचे कर्मचारी व ट्रेलर, रिक्षा चालक आदी उपस्थित होते. उपस्थितांना न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियमांची माहिती देऊन प्रबोधन केले.