| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
आईच्या प्रियकराने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. याप्रकरणी आईचा प्रियकर असलेल्या मुलीच्या चुलत काकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर नवी मुंबई मधील रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ सातारा जिल्ह्यातील पाटण येथील रहिवाशी असलेली पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडील आणि बहिणी सोबत नवी मुंबईतील घणसोली बाळे गावात आपल्या चुलत काका सोबत एकाच घरात राहण्यास होती. एकत्र असतानाच चुलत काका आणि आईमध्ये अवैध संबंध असल्याची माहिती पीडित मुलीला मिळाली. या बाबत आपल्या वडिलांना काहीही माहिती देऊ नको अशी विनंती पीडितेच्या आईने मुलीकडे केली. मात्र, त्या नंतरही या बाबतची माहिती पीडितेने वडिलांना दिल्याने याचा राग येऊन आरोपी काका श्रीकांत सूर्यवंशी याने अल्पवयीन पुतणीस घरात एकट्याने गाठत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत नराधम काकाच्या तावडीतून आपली कशी बशी सुटका करून घेतलेल्या पुतणीला घडलेल्या प्रकाराची माहिती कोणाला दिल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस तक्रार केल्यास समाजात बदनामी होईल या भीतीने घाबरलेल्या पीडितेन वडिलांसोबत कायमस्वरूपी गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. तर पीडितेच्या आईने आरोपी काका सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने पीडित अल्पवयीन मुलीने रबाळे पोलीस ठाणे गाठत आरोपी काका विरोधात तक्रार दाखल केली असून, रबाळे पोलिसांनी आरोपी श्रीकांत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे.
संतापजनक! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
