। हमरापूर । वार्ताहर ।
पेण तालुक्यात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून कणे व इतर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे.कणे येथील पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी शिर्की संचलित आनंद माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.पहिल्याच दिवशी शहरासह तालुक्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील जवळपास 100 हून विद्यार्थी व विद्यार्थीनींना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लस उपलब्ध होतील त्यानुसार सर्वच शाळा व कॉलेजमध्ये ही मोहिम युध्दपातळीवर राबवली जाईल. जेणेकरून कोरोनो व इतर व्हायरंट पासून बचाव करता येईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा खेडेकर यांनी दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर, डॉ. मनिषा म्हात्रे, शाळेय समितीचे सदस्य जयवंत बांधणकर, मुख्याध्यापिका पी. पी. पाटील, विश्वास मोकल, संदीप पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य सेविका व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
पेण तालुक्यात विद्यार्थी लसीकरणास प्रारंभ
