विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरान प्रभाग क्र. 7 मधील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी विजेचा पोल बसविण्यात आले आहेत; परंतु, अद्यापही विजेचा पत्ताच नाही. रेल्वे स्टेशनच्या भागातून वाहून येणारे पावसाळी पाणी हे सुद्धा गटारे कचऱ्यामुळे पूर्णपणे बंद झालेली आहेत. त्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहत असते. सुलभ शौचालयाची देखील दयनीय अवस्था झाली असून त्याठिकाणी काहीवेळा पाण्याची कमतरता जाणवते. हे सुलभ शौचालय रेल्वे स्टेशनजवळ असल्यामुळे याचा उपयोग पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर होत असतो. परंतु, ही शौचालये अस्वच्छ असल्यामुळे तसेच पाण्याअभावी पर्यटकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे या शौचालयाच्या बाजूला रेल्वेच्या जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत त्याठिकाणी कुणीही वास्तव्यास नसल्याने नागरिकांनी या भागाला एकप्रकारे डंपिंग म्हणून उपयोग सुरू केल्याने सर्व कचरा टाकला जात आहे. हा कचरा आणि माती पावसाळ्यात रस्त्यावर येत असते अनेकदा काचेच्या बाटल्या नगरपरिषदेचे कर्मचारी असोत किंवा घनकचरा व्यवस्थापन कामगार असोत कोणत्याही भागातील काचेच्या बाटल्या गोळा केल्या जात नाहीत. पेव्हर ब्लॉकचे रस्ते सुद्धा जुने झाले असून सततच्या रहदारीमुळे रस्त्यांना जागोजागी खड्डे पडलेले आहेत. मोठ्या गटारात हॉटेलचे सांडपाणी वाहून येत असते. याकामी दूरपर्यंत मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकून सांडपाण्याचा निचरा केल्यास सर्व गटारे घाणीपासून मुक्त होण्याची गरज आहे. या सर्व अत्यावश्यक कामांची दि.16 रोजी विद्यमान नगरसेवक संतोष शेलार आणि नगरसेविका अनिता रांजाणे तसेच स्वच्छता विभागाचे चंद्रकांत शेटे यांनी पाहणी केली.

Exit mobile version