| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये दरवर्षी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची नेहमीच वाताहत होत असते. लाल मातीच्या रस्त्यावरून पावसाळी पाणी वाहून जात असल्यामुळे महत्वाच्या पॉईंट भागातील रस्त्यांचे दगडगोटे वर आलेले होते. त्यामुळे हातरीक्षा चालकांना तसेच दूरवर असणार्या ज्या महत्त्वाच्या पॉईंटवर ठराविक घोडेवाले पर्यटकांना मुख्य पॉइंट्स दाखवत असतात, त्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. याकामी माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदेंनी दि.2 नगरपरिषदेच्या कार्यक्षम प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना लेखी निवेदन सादर केले होते. त्यानुसार सुरेखा भणगे यांनी ताबडतोब आपल्या कामगारांना सूचना देत या महत्त्वपूर्ण कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्व कष्टकरी, श्रमिकांनी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे आणि प्रशासक सुरेखा भणगे यांचे आभार मानले आहेत.