आयपीएलला दुखापतीचे ग्रहण

आठ संघातील डझनभर खेळाडू जखमी

| मुंबई | प्रतिनिधी |
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस बाकी आहेत, मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक स्टार क्रिकेटर्स दुखापतीमुळे लीगमध्ये खेळताना दिसणार नाहीयेत.या दुखापत झालेल्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, जॉनी बेअरस्टो, काइल जेम्सन, विल जॅक्स, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णासारखे क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तसेच जोश हेझलवूड, रजत पाटीदार, मोहसीन खान, लोकी फर्ग्युसन, मुकेश चौधरी सारखे क्रिकेटपटूंच्या सहभागाबद्दल देखील साशंकता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे क्रिकेटपटूंच्या दुखापतीने सर्वाधिक प्रभावित झालेले संघ आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेता गुजरात टायटन्स हे एकमेव संघ आहेत ज्यांना आतापर्यंत दुखापतींचा फटका बसलेला नाही.यावेळी लीगवर दुखापतींचे सावट दिसत आहे. या दुखापतींमुळे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना त्यांचे कर्णधार बदलावे लागले. या हंगामात पंतच्या जागी दिल्लीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद दिले आहे. त्याचबरोबर कोलकाताने श्रेयसच्या जागी नितीश राणाला कर्णधारपदी नियुक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. त्याच्या खेळाण्याबाबत साशंकता आहे. यामुळेच केकेआरने राणाला कर्णधार म्हणून निवडले आहे. कोलकाताकडून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनलाही दुखापतीमुळे स्पर्धेतील सुरूवातीचे सामने खेळण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.
आरसीबीसाठी गेल्या हंगामात 152.75 च्या स्ट्राइक रेटने 333 धावा करणारा रजत पाटीदार आणि त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाजजोशहेझलवूडयांच्यासहभागाबद्दलही साशंकता आहे.

पाटीदारवर टाचेच्या दुखापतीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार सुरू आहेत, तर हेझलवूड दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळला नव्हता. गेल्या हंगामात सर्वात जलद शतक झळकावणारा पाटीदार दुखापतीतून सावरत असल्याचं म्हटलं जात आहे.पण अर्ध्या स्पर्धेत तो बाहेर राहू शकतो. आरसीबीकडून खेळणारा इंग्लंडचा फलंदाज विल जॅकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलची निवड करण्यात आली आहे.

मोदी स्टेडियमवर उद्घाटन
शनिवारी यंदाच्या मोसमातील पहिला सामना गुजरात जाएंटस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान होणार आहे. उद्घाटनाचा पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम होणार असून अनेक सेलिब्रेटी थिरकणार आहेत. कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये होम आणि अवे या फॉरमॅटमध्ये स्पर्धा होणार आहे. आयपीएलचा सामना सुरू होण्यापूर्वी नेत्रदीपक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात हजेरी लावणार्‍या सेलिब्रेटींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.सेलिब्रेटी लावणार हजेरीवृत्तानुसार, रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करू शकतात. त्याशिवाय, टायगर श्रॉफ, कतरिना कैफ आणि अरिजीत सिंह हे सेलिब्रेटी परफॉर्म करू शकतात.


सूर्या करणार नेतृत्व
मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माला दुखापतींचा मोठा इतिहास आहे, तो आता टीम इंडियाचे महत्त्वाचे सामने गमावण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे तो आयपीएलमधील निवडक सामने निवडेल आणि डग आऊटमधून सूर्यकुमारला मार्गदर्शन करेल. आयपीएल फ्रँचायझींसाठी खेळताना राष्ट्रीय संघाच्या कर्तव्यांसाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवले पाहिजे.असे रोहितचे म्हणणे आहे.

Exit mobile version