अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नवी दिल्ली | प्रतिनिधी |

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी (दि.18) मोठा गोंधळ उडाला. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भाषण करत असताना एका महिलेने त्यांच्यावर शाईफेक केली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शाईफेकीनंतर दिपके यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला, तर आंदोलनकर्त्यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले. शाईफेकीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दिपके यांनी केला असून, आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version