स्कुटीला इनोव्हाची धडक; तिघे जण जखमी

| पनवेल | वार्ताहर |

भरधाव इनोव्हा गाडीवरील चालकाने एका स्कुटी गाडीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाटील कुटुंबीय जखमी झाल्याची घटना पनवेल-मुंब्रा हायवेच्या कच्च्या रोडवरील खुटारी गावाजवळ घडली आहे.

क्लेन सिटी मेन गेट समोर जिओ पेट्रोल पंप खुटारी गाव येथून संदीप भगवान पाटील (वय 36) यांनी त्यांच्या स्कुटी गाडीत पेट्रोल भरून ते तेथून गाडी वरून जात असताना, त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूस इनोव्हा गाडीने घसारा मारून अपघात केल्याने यात संदीप पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रांजली पाटील (वय 34) व सहा वर्षीय मुलगी श्राव्या यांना सध्या व गंभीर स्वरूपाच्या दुखापत झाल्या असून, या घटनेनंतर इनोव्हा गाडीवरील चालक गाडीसह पसार झाल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version