मिशन शंभर राजपत्रित अधिकारी
। पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघ यांच्यामार्फत मिशन पोलादपूर तालुक्यातील 100 राजपत्रित अधिकारी या अभिनव उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी प्रश्नमंजुषा परीक्षा विद्यामंदिर पोलादपूर येथे घेण्यात आली. या परिक्षेत 730 विद्यार्थ्यांमधून सर्वोच्च गुण मिळवणारे दोन गटातून प्रत्येकी 20 विद्यार्थी निवडण्यात आले.
या परीक्षेसाठी एकूण 730 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. सदर परीक्षा इयत्ता पहिली ते पाचवी एक गट व इयत्ता सहावी ते आठवी दुसरा गट अशा पध्दतीने घेण्यात आली. पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघ यांनी प्रकाशित केलेल्या प्रश्नमंजुषा या पुस्तकावर आधारित सदर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून दोन्ही गटातून सर्वोच्च गुण मिळवणारे प्रत्येकी 20 विद्यार्थी निवडण्यात आले. लवकरच विद्यार्थ्यांची पुन्हा तोंडी परीक्षा होणार आहे. या परीक्षेत गट 1 ते 5 मध्ये मधुरा कोलवडकर, ॠदित्य निकम, अवनी जाधव, अमेय धालप, रुद्र पवार, साईराज सोडनवार, दिपश्री बिरादार, नेत्रा कदम, आराध्य चिकणे, तेजल बामणे, सानवी ढेप , स्वरांजली रुबदे, स्वरा पवार, समर्थ जाधव, आरोही सोनावणे, सोनाक्षी दळवी, स्वरुप देवे, अवनी गावंडे , युक्ता शिंदे, मयन भिलारे तर गट 6 ते 8 मध्ये वेदांत पवार, ज्ञानेश्वरी दवंडेे, मनोज नाईकनवरे, श्रुती साळुंखे, चेतना शिंदे,अनिकेत मांगले, आर्यन कोळेकर, प्रांजल भोये, आनंदी भंडलकर, अथर्व जगताप, श्रेयस साळुंखेे, श्रावणी भिलारे, अर्जुन दरेकर, ओमकार शिंदे, सतिश ढवळे, साची शेलार, कल्पेश पिंजारी, सानवी पवार, आर्या सलागरे, सम्यक जाधव यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
या परिक्षेसाठी डॉ. गुलाबराव सोनावणे, डॉ. दिव्या सोनावणे, रामदास कळंबे, सुभाष साळुंके, शिवाजी महाडिक, रामदास उतेकर, राजेश सुर्वे, सोपान चांदे, रविंद्र साळुंके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षिका प्राजक्ता मोरे व प्रश्नमंजुषा समितीचे अध्यक्ष अनंत गोळे, प्रदीप वरणकर, समीर सालेकर यांनी रहिवासी शिक्षक संघ व प्रश्नमंजुषा समिती सदस्यांना सोबत घेऊन उत्कृष्ट नियोजन केले.







