मुख्याधिकार्‍यांची स्वच्छता मोहिमेची पाहणी

। माथेरान। वार्ताहर ।

पर्यटनस्थळ माथेरानमध्ये अनेकदा पर्यटकांकडून प्लास्टिक बाटल्या टाकल्या जातात. यामुळे प्रामुख्याने पॉईंट्स भागात कचर्‍याचे साम्राज्य निदर्शनास येते असल्याने स्वतः मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी याबाबत स्वच्छता राखण्यासाठी संबंधित कर्मचारी वर्गाला सूचना देऊन महत्त्वाची वर्दळीची ठिकाणे स्वच्छ करून घेतली. सध्यातरी घनकचरा व्यवस्थापन मार्फत कचर्‍याचे संकलन करण्यात येते. परंतु जागोजागी कचराकुंडी नसल्याने पर्यटकांकडून सुका कचरा कुठेतरी जंगलात अथवा रस्त्याच्या बाजूला टाकला जातो. दर महिन्याला माथेरान नगरपरिषद क्षेत्रात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मासिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येते त्यावेळी उत्तम प्रकारे स्वच्छता केली जात आहे.


घनकचरा व्यवस्थापन ठेक्याची मुदत संपत असून लवकरच नवीन निविदा प्रक्रिया सुरू करणार आहेत. यापुढेही स्वच्छता बाबतीत नगरपरिषदेच्या माध्यमातून तंतोतंत पालन केले जाणार आहे.

राहूल इंगळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिका
Exit mobile version