पारगाव डुंगी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी

| नवीन पनवेल । वार्ताहर ।
पारगाव डुंगी व पारगाव गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेट दिली. गेल्या पाच वर्षांपासून विमानतळाच्या दगड-मातीच्या भरावामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. पारगाव व पारगाव डुंगी गावाचे पुनर्वसन करण्याबाबत व पूरग्रस्त भागातील रहिवाशांना मदत देण्याबाबत सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्यावर सिडकोकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे सरपंच अहिल्या नाईक यांनी गार्‍हाणे मांडले. ग्रामस्थांच्या मागणीबाबत सिडको व प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, तसेच सिडकोकडे योग्य ती मागणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीसाठी वेळ मागण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. या वेळी पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश घरत, पारगावच्या उपसरपंच निशा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत तारेकर, विश्‍वनाथ पाटील, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोरेश्‍वर मोकल आदी उपस्थित होते.

Exit mobile version