तळोजे भुयारी मार्गाची रेल्वे अधिकार्‍यांकडून पाहणी

| पनवेल | वार्ताहर |
तळोजा रेल्वे फाटकवर परिसरातील भुयारी उभारलेल्या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात जवळपास चार फुटांपर्यंत पाणी तुंबल्याने तळोजा वसाहतीमधील रहिवाशांना तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वे फाटक मार्गावरुन ये-जा करावी लागली होती. याविषयी रहिवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ‘मध्य रेल्वे’चे अतिरिक्त उपविभागीय व्यवस्थापक प्रदीप पोळ यांनी पाहणी करून भुयारी मार्गात पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश अभियंता विभागाला दिले.

दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वारवर असलेल्या रेल्वे फाटकच्या दोन्ही बाजुने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तळोजा रेल्वे फाटक शेजारी 50 कोटीहून अधिक रुपये खर्च करून भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी ’रेल्वे’ने 50 हॉर्स पॉवरचे एक आणि 25 हॉर्स पॉवरचे दोन पंप तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्यास आपत्कालीन परिस्थितीसाठी 200 केव्हीचा जनरेटर या ठिकाणी सज्ज ठेवले आहेत.

Exit mobile version