। म्हसळा । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार समीर घारे यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील दरडग्रस्त भागात भेट देऊन दरडग्रस्त गावे मरियमखार, महंमदखणी खार, वावे, शेख मोहल्ला, लिपणी आदि गावांना भेट देऊन ग्रामस्थाशी चर्चा केली. पावसाळ्यात होणार्या अतिवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. अशा वेळी ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तशी परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनेे इतर ठिकाणी त्वरित स्थलांतर करावे. वेळोवेळी शासनाकडून आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. वावेशेख मोहल्ला, लिपणीवावे, मारियामखर, महमदखनिखार गावातील ग्रामस्थानी अशा परिस्थितीत गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, समाजमंदिरे, गावकीचे घर, जमातीचे घरात सुरक्षतेची खात्री असणार्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन तहसीलदार घारे यांनी केले.







