| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेचे बांधकाम सभापती आणि मुख्याधिकारी यांनी कर्जत शहरातील जीवन शिक्षण मंदिर या मुलांच्या शाळेच्या शेजारील जीर्ण झालेल्या धोकादायक पोलीस वसाहत इमारतीची पाहणी केली. तसेच जुन्या नगरपालिकेच्या अर्धवट पडलेल्या इमारतीचीही पहाणी केली. कर्जत नगरपरिषदेचे बांधकाम सभापती महेंद्र चंदन आणि मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या जीर्ण झालेल्या पोलीस वसाहत असलेल्या इमारतीची पहाणी केली. ही इमारत पाडणे गरजेचे असून त्याबाबत संबंधित विभागाला पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी सांगितली. तसेच त्यांनी लोकमान्य टिळक चौकात असलेल्या कर्जत नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीचा कोसळलेल्या भागाची पहाणी केली.
जुन्या पोलीस इमारतीची पाहणी
