। कर्जत । प्रतिनिधी ।
पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील मुख्य नाले तसेच छोटे मोठी गटारे साफसफाई झाली की नाही याची पाहणी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केली व यावेळी संबंधित कर्मचार्यांना काही सूचना करण्यात आल्या.
कर्जत नगर परिषद परिसरातील बामचा मळा, इंदिरानगर, दहिवली, मुद्रे, भैरवनाथ नगर, कोतवाल नगर, विठ्ठलनगर, महावीर पेठ, बाजार पेठ, हनुमान मंदिर परिसर पाटील आळी, भिसेगाव, गुंडगे व इतर सर्व प्रभागातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये खडी टाकण्याऐवजी पावसाळ्यापूर्वी डांबराचे पॅचेस मारले आहेत ते योग्य पद्धतीने भरले की नाही तसेच नालेसफाई, पावसाच्या पाण्यासाठी चर मारणे, इतर कामांची पहाणी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केली. याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका भारती पालकर, नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, तसेच संबंधित कामांचे ठेकेदार व त्या प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.