परशुराम घाट ते खेरशेत लावलेल्या झाडांची पाहणी

| चिपळूण | प्रतिनिधी |

इगल कंपनीचे सुपर व्हायझर शहाबुद्दीन यांच्यासह जलदूत शहानवाज शाह यांनी चिपळूण परशुराम घाट ते खेरशेत यादरम्यान रस्त्यालगत व मध्य भागात केलेल्या वृक्ष लागवडीबाबत पाहणी केली. मागील वर्षी लावलेल्या झाडामध्ये 40 टक्के झाडे जगली आहेत. तर या रोपांकडे अजिबात लक्ष न दिल्याने 40 टक्के झाडे मृत पावली असल्याचे जलदूत शहानवाज शाह यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गावरील रुंदीकरणात येणारी झाडे तोडण्यात आली. मात्र, त्या बदल्यात नवीन वृक्षारोपण करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्याप्रमाणे परशुराम घाट ते खेरशेत यादरम्यान लावलेल्या झाडांची ईगल कंपनीचे सुपरवायझर शहाबुद्दीन यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन शाहानवाज शाह यांनी लावलेल्या झाडांची माहिती करून दिली. मागील वर्षी लावलेल्या झाडामध्ये 40 टक्के झाडे जगलेली आहेत. 20 टक्के झाडांचे मूळ जिवंत असल्याचे दिसून आले. त्यांना पालवी आलेली आहे. तर या रोपांकडे अजिबात लक्ष न दिल्याने 40 टक्के झाडे मृत पावलेली आहेत. त्यामुळे या झाडांची लागवड करणे फार गरजेचे आहे.

तसेच, या भागात वाढलेले गवत तातडीने काढणे गरजेचे आहे. तसेच मध्यभागी मोठ्या प्रमाणात झुडुप वर्गीय रोपे लावणे गरजेचे आहे. काही ठिकाणी मिडीयनमध्ये मातीच्या जागी काँकरीट टाकलेले आढळून येत आहे. तर काही ठिकाणी दगड गोटे आहेत. या सर्व बाबी शहाबुद्दीन यांना प्रत्यक्ष जागेवर दाखवून दिल्या आहेत. ही कामे 15 जुलैच्या आत पूर्ण करुन देण्याचे शहाबुद्दीन यांनी आश्वासन दिले आहे.

Exit mobile version