अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसवा; ग्रामस्थांकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन

। पाताळगंगा । वार्ताहर ।
हाळफाटा मार्गे अंजरुण-केळवली-पळसदरी-कर्जत फाटा मार्गाचे रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून टी.एन.टी.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होत असताना नावंढे स्टाँप केळवली स्टेशन, डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव या वर्दळीच्या ठिकाणी असून स्टाँपवर गतीरोधक न टाकल्यामुळे मोठे अपघात होत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे पोलीस निरिक्षक, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. वाहन चालक वेगाने वाहन चालवत असतात. यामुळे दररोज असंख्य लहान-मोठे अपघात घडत असून याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून विद्यार्थी, खासगी क्लासेसचे विद्यार्थी, महिला वर्ग, चाकरमानी या मार्गाचा अवलंब केला जात आहेत. या महामार्गावर गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग असल्यास वाहनचालक सावकाश जात असल्यामुळे अपघाताला आळा बसत असतो. मात्र काही ठिकाणी गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येथे गतिरोधक बसवावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी माणकीवली उपसरपंच विकास रसाळ, नावंढे सदस्य श्रीकांत हाडप, सामाजिक कार्यकर्ते अशोक पिंगळे, जगदीश आगिवले, युवा पत्रकार समाधान दिसले आदी प्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version