| नागपूर | प्रतिनिधी |
अनधिकृत खनिज उत्खनन आणि वाळूचा उपसा रोखण्यासाठी सीसीटिव्ही आणि ड्रोन कॅमेरे तातडीने लावले जावेत,अशी मागणी शेकापचे आ,जयंत पाटील यांनी लेखी प्रश्नाद्वारे सरकारकडे केली आहे. हे गोरख धंदे थांबविण्यासाठी दि.15 जानेवारीपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही,ड्रोन कॅमेरे कार्यान्वित केले जातील,असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तरात नमूद केले आहे.
विधानपरिषदेत उपस्थित झालेल्या या प्रश्नावर आ.जयंत पाटील यांनी असे म्हटले आहे की, महसूल खात्यांतर्गत परवानगी दिल्यानुसार खनिज उत्खनन अथवा वाळूचा उपसा केला जातो.प्रत्यक्षात त्याची रॉयल्टी 10 टक्केही भरली जात नाही ही वस्तुस्थिति आहे .याकरीता सीसीटीव्ही केमरे ,ड्रोन किती दिवसात लावणार तसेच लावलेली यंत्रणा सुस्थितित आहे की नाही ,हे पाहण्यासाठी लागणार्या यंत्रणेला किती खर्च येणार आहे . असा सवाल जयंत पाटिल यांनी विधान परिषदेत महसूल मंत्र्यांना केला .
यावर उत्तर देताना अनधिकृत वाळूचा उपसा,अनधिकृत खनिज उत्खनन सारखा गोरखधंदा रोकण्यासाठी नवीन वर्षात 15 जानेवारी पर्यन्त याची कार्यवाही केली जाईल असे महसूल मंत्री विखे- पाटिल यांनी सांगितले .






