| पुणे | वृत्तसंस्था |
अमरावतीच्या मोर्शीचे अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करुन त्यांचा अवमान केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना मिळत नाही. नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची पोरगी ज्यांचा पानाचा ठेला, धंदा, किराणा दुकान आहे, अशा मुलांना भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकर्यांच्या पोरांना भेटते, शेतकर्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही, असे महिलांविषयी बेताल वक्तव्य केले आहे. दरम्यान, महिलांविरोधातील या वादग्रस्त वक्तल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून राजकीय वर्तुळातूनदेखील टीका केली जात आहे.