एकात्मिक सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील अतिशय दुर्गम असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत येथील आदिवासीबहुल गावातील एकूण 27 (महिला शेतकरी-03 आणि पुरुष शेतकरी-24) शेतकऱ्यांना युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारा कार्यान्वयित आणि यूपीएस फाउंडेशन अर्थसहाय्यित इकोनॉमीक एमपॉवरमेंट ऑफ फारमर्स इन कर्जत प्रकल्प अंतर्गत दि. 7, 8 मार्च रोजी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण पुणे येथे आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणात शेतीतील सेंद्रिय उत्पादनपासून ते थेट ग्राहक विक्रीपर्यंतचे प्रात्यक्षिक सहित मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, बाजारात मिळणारे महागडे रासयनिक उत्पादने आणि त्याचे दुष्परिणाम तसेच रासायनिक किडनाशकांना असलेले सेंद्रिय पर्याय निंबोळी अर्क, करंज तसेच इतर लोकल कडूपाला असलेल्या वनस्पतींचा उपयोग करून कशा प्रकारे कीड नियंत्रण करता येते त्याबाबत मार्गदर्शन केले. तर प्रमोद बोडके यांनी देसी गायचे महत्त्व, गोठा स्वच्छताचे महत्त्व, कमी जागेत आणि कमी पाण्यात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानचा उपयोग करून उन्हाळ्यातही हिरवे लुसलुशीत चाऱ्याचे नियोजन कसे करावयाचे याचे प्रत्यक्षीक दाखवले. प्रिया बोडके यांनी ॲग्री प्रोडक्ट संबंधित हायजीनवर भर देत हातमोजे वापरणे, कृषी माल व्यवस्थित धुणे, इलेक्ट्रॉनिक काट्याच्या सहाय्याने व्यवस्थित आणि अचूक वजन करण्यावर भर दिला. सदर प्रशिक्षण यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी युनायटेड वे मुंबई कार्यरत जल संजीवनी कर्जत प्रकल्पाचे फिल्ड ऑफिसर दीपक कवठे आणि प्रमोद धादवड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version