आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा

| रायगड | प्रतिनिधी |

डीइएस आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सांगली येथील श्री कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशालेच्या भव्य मैदानावर संपन्न झाली. यामध्ये आपल्या आरसीएफ शाळेच्या बारा वर्षांखालील मुले व मुली, चौदा वर्षाखालील मुले व मुली तसेच सतरा वर्षांखालील मुले व मुली अशा एकूण 39 खेळाडूंचा सहभाग होता.

यामध्ये बारा वर्षांखालील मुले यांनी जनरल चॅम्पियनशिप पटकावली तर याच गटातील कुमार ध्रुव जामकर याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.

12 वर्षाखालील मुलांच्या गटात ध्रुव गणेश जामकर याने 80 मी धावणे प्रथम व लांब उडी द्वितीय, आराध्य संजय म्हात्रे याने 80 मी धावणे तृतीय क्रमांक पटकावला. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात राणी लक्ष्मण ठाकूर 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात विशाल कौशलेंद्रकुमार सिंग 80 मी. हरडल्स प्रथम व उंचउडी द्वितीय तर जीत किशोर पाटील याने 100 व 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 14 वर्षा खालील मुलींच्या रिले स्पर्धेत श्रावणी रत्नाकर पाटील ,पर्णवी अमोल मयेकर, चिन्मयी गणेश ओव्हल, शुभ्रा प्रसन्ना कटोर, रिया विरेश पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
17 वर्षा खालील मुलांच्या गटात आर्यन रक्षण राऊत याने 100 मी. प्रथम व 200 मी. तृतीय तर संगम कैलास कटारे याने लांब उडी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. रिले स्पर्धेत आर्यन रक्षण राऊत , विकास रामध्रुव चव्हाण , चिन्मय राकेश रोकडे, संगम कैलास कटारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वरील सर्व विद्याथ्यांना क्रीडा शिक्षिका पद्मश्री चौगुले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. निलाक्षी गोखले, नरेश कडू यांनी सहकार्य केले. सर्व विजयी स्पर्धकांचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व आर सी एफ प्रशासन थळ, शाळेच्या मुख्याध्यापिका संविधा जाधव यांनी कौतुक केले

Exit mobile version