आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

| तळा | प्रतिनिधी |

द. ग . तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे सोमवारी (दि.2) प्रभाकर जोशी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जी.एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळाचा विद्यार्थी दीक्षांत घाग प्रथम वर्ष बी. एस. सी. याने आपला सहभाग नोंदवून भारतीय संविधान – आयडिया ऑफ इंडिया या विषयावर आपले मनोगत अत्यंत परखडपणे व्यक्त केले. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल निकम आणि सांस्कृतिक विभागाचे इतर सदस्य तसेच महाविद्यालयातील इतर विभागातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दोन हजार रोख, सन्मानचिन्ह अणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे संस्थापक मा. डॉ. नंदकुमारजी वेदक, संस्थेचे सचिव उन्मेशजी वेदक तसेच महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य मा. पुरुषोत्तम मुळे आणि डॉ. नानासाहेब यादव यांनी दीक्षांतचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version