प्ले-ऑफची रंजक शर्यत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला आणि पॉइंट टेबलमध्येही मोठी झेप घेतली. तर, गुजरात टायटन्स संघ या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. ना फलंदाज काही अप्रतिम करू शकले ना गोलंदाजांनी आपली छाप सोडली.

दिल्लीच्या विजयामुळे काही संघांना आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. त्यांचे आता 6 गुण झाले आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या पराभवामुळे नेट रनरेटमध्ये मोठा फटका बसला आहे. गुजरातचे देखील 6 गुण आहेत, परंतु त्यांचा रन रेट -1.303 वर पोहोचला आहे. आयपीएलमध्ये, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सने देखील आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 3 विजय नोंदवले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे दिल्ली गुणतालिकेत गुजरातपेक्षा एक स्थान वर आहे.

Exit mobile version