शहीद भाई कोतवाल चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यार्तील क्रांतिकारक यांच्या जीवनावरील शहीद भाई कोतवाल या दिवंगत माजी सरपंच प्रवीण पाटील निर्मित केलेल्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले आहे. मुरबाड, कर्जत तालुक्याच्या भूमीत घडलेल्या रक्तरंजित इतिहासावर आधारित तयार झालेल्या बहुचर्चित शहीद भाई कोतवाल’ चित्रपटाचा झेंडा लागला. आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वरजाई आर्ट मिडीया प्रोडक्शनच्या चित्रपटास एमआयएफएफमध्ये मिळाले पाच पुरस्कार मिळाले. मुंबई अंधेरी येथील मेयर ऑडिटोरीयममध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वात जास्त पुरस्कार मिळवून 2020-21 चा शहीद भाई कोतवाल हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट, तसेच निर्माता-प्रविण पाटील, सागर हिंदुराव, सिध्देश सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-एकनाथ देसले आणि पराग सावंत तसेच सर्वोत्कृष्ट डि.ओ.पी-तुषार विभुते,सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन-देवदास भंडारे,सर्वोत्कृष्ट डि.आय-वैभव वामन यांना हेर पुरस्कार मिळाले आहेत. सदर महोत्सवात अनेक कलाकार,तंत्रज्ञ, राजकीय दिग्गजानी उपस्थिती दर्शविली होती.

Exit mobile version