| पनवेल | वार्ताहर |
श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी आणि रिसर्च सेंटर, नवीन पनवेल तसेच ऑपरंट फार्मसी फेडरेशन आणि अखिल भारतीय औषधनिर्माणशास्त्र शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्म 360 इमर्जिंग ट्रेंड्स आणि फ्युचर पर्स्पेक्टिव्स इन फार्मास्युटिकल्स’ या विषयाला अनुसरून अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सम्मेलनाचे आयोजन 22, 23 मार्च 2024 रोजी श्री दादासाहेब धनराजजी विसपुते सभागृह, नवीन पनवेल, नवी मुंबई येथे होणार आहे.
सदर संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी आणि मानांकित वक्ते व संशोधकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विश्वभरातील सम्माननीय वक्तांची श्रेणी येथे समाहित केली जाईल. या संमेलनामध्ये विविध राज्यातून 450 हून अधिक विद्यार्थी व संशोधकांनी नोंदणी केल्याची माहिती डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. आशिष जैन यांनी दिली आहे. तसेच 250 हून अधिक विद्यार्थी व संशोधक त्यांचे प्रबंध ई-पोस्टरच्या माधम्यांतून सादर करणार आहेत. हे संमेलन शैक्षणिक आणि औद्योगिक संशोधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा अनुभव देणारे मौल्यवान व्यासपीठ ठरेल.
विसपुते महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद
