मुरुडच्या आनंद वारगेचा समावेश
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
नेपाळ देशातील पोखरा येथे झालेल्या अंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताने सुवर्णपदक मिळविले आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत विरुद्ध नेपाळ अशी लढत होती. यामध्ये भारतीय संघाने नेपाळचा सात गुणांनी पराभूत करुन भारतीय कबड्डी संघाने सातासमुद्रपार पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत भारतवासीयांची मान उंचावली आहे. या संघात मुरुड जंजिरा तालुक्यातील उंडरगाव येथील कबड्डी खेळाडू आनंद रामा वारगे याचा या संघामध्ये सहभाग होता. वारगे यांनी भारतीय संघातून खेळुन मुरुड तालुक्याचे नाव साता समुद्रपार पोहचवले आहे. त्याच्या कामगिरीचे मुरुड तालुक्यात कौतुक होत आहे.