। अलिबाग । वार्ताहर ।
21 जून रोजी हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील स्वामी समर्थ सभागृहात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना योगगुरु रविंद्र काशिनाथ पाटील, रांजणखार, व योगगुरू संजीव म्हात्रे यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.
इयत्ता दहावीचे विद्यार्थी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना अभ्यासाबरोबरच शरीर व मन प्रसन्न राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी थोडावेळ योगाचे प्रकार केले तर नक्कीच शरीर व बुद्धिमत्ता विकसित होऊन विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होऊ शकते. तसेच निसर्गातील पिंपळ, अडुळसा, दूर्वा, गुळवेल, तुळस, पपई इत्यादी नैसर्गिक वनस्पतींचे महत्त्व व उपयोग सांगून योगाचे बैठे प्रकार योगगुरु रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर करून विद्यार्थ्यांना सहभागी घेतले. योगगुरु संजीव म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांसमोर योगाच्या खडे प्रकारांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसह केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य निर्माण झाले.
इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व वर्गशिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांसमोर योगाच्या वेगळ्या प्रकारांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांकडून करून घेतले. विद्यालयाचे पर्यवेक्षक बी. डी. गायकवाड सर यांच्या हस्ते योगगुरुंचा यथोचित सन्मान करण्यात आला. शिकारे बी. जी. यांनी योगगुरूंचे आभार व्यक्त करून इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी दररोज थोडा वेळ योग प्रकार करण्यासाठी देतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सदानंद पाटील, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक शिकारे, आंधळे तसेच शिद सर कार्यक्रमास उपस्थित होते.
चला योगला सुरुवात करुया
ॐ काराच्या शुद्ध मनाने
आपण प्रार्थना गाऊया
श्वसनमार्ग शुद्धीनंतर सूर्य
नमस्कार ते घालूया
आयुष्य बुद्धी अन् मनोबलाचा
विकास आपण साधूया