| नवी दिल्ली | वार्ताहार |
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह आणि महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची शुक्रवारी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. प्रमुख कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दुसर्यांदा आंदोलन पुकारल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. दोन्ही वेळा त्यांनी स्वत:वरील आरोपांचे खंडन करताना आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले.