शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा डाव

राकेश टिकैत यांचा आरोप
लखनऊ | वृत्तसंस्था |
कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.
लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान रॅलीत टिकैत बोलत होते.यावेळी त्यांनी सरकारने शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्‍न सोडवावे, अन्यथा ङ्गआम्ही कुठेच जाणार नाहीफ आंदोलन सुरू ठेवणार,असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान आधारभूत किमतीची हमी देणार्‍या कायद्याच्या मागणीचे स्पष्ट उत्तर द्यावे. मुख्यमंत्री असताना मोदी यांनी याचे समर्थन केले होते.
राकेश टिकैत, शेतकरी नेते

टिकैत पुढे म्हणाले की, पंतप्रधान देशासमोर माफी मागू शकतात, पण देशासमोर माफी मागून शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. एमएसपीची हमी देण्यासाठी कायदा केल्यास त्यांना वाजवी दर मिळतील. देशातील जनता आता जागरूक झाली आहे. केंद्रावर हल्ला करताना टिकैत म्हणाले, संपूर्ण देश खाजगी ङ्गमंडीफ (बाजार) बनणार आहे असे दिसते. आमचा संघर्ष सुरूच राहील. आम्ही ङ्गसंघर्ष विश्राममची घोषणा केली नाही. सरकारनेच ङ्गसंघर्ष विश्रामम घोषित केला. आमच्याकडे इतर अनेक समस्या असल्याने आम्ही ऑफर नाकारली आहे.असे ते म्हणाले.

Exit mobile version